अहमदनगर लोकसभा मतदार संघात छाननीमध्ये ३६ उमेदवारांचे अर्ज वैध तर ६ उमेदवारांचे अर्ज अवैध

0
26

नगर – ३७ अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असुन ६ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात हनुमंत देविदास पावणे (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), शेळके विश्वनाथ श्रीरंग (अपक्ष), पानसरे छगन भिकाजी (अपक्ष) व प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले आहेत. नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये उमाशंकर श्यामबाबु यादव (बहुजन समाजपार्टी), निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), विखे सुजय राधाकृष्ण (भारतीय जनता पार्टी), गोरख दशरथ आळेकर (अपक्ष), डॉ. योगिता प्रविण चोळके (अपक्ष), सुर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष), जहीर युसुफ जकाते (अपक्ष), प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे (अपक्ष), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (हिंदू एकता आंदोलन पार्टी), शेकटकर अनिल गणपत (अपक्ष), मुक्ता प्रदीप साळुंके (इंन्सानियत पार्टी), मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), आरती किशोरकुमार हालदार (प्रबुद्ध रिपब्लीकन पार्टी), दिलीप कोंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी), निलेश साहेबराव लंके (अपक्ष), रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पार्टी), गंगाधर हरिभाऊ कोळेकर (अपक्ष), प्रविण सुभाष दळवी (अपक्ष), मनोरमा दिलीप खेडकर (अपक्ष), बिलाल गफुर शेख (अपक्ष), प्रतिक अरविंद बारसे (अपक्ष), राणी निलेश लंके (अपक्ष), परवेज उमर शेख (ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन), कैलाश निवृत्ती जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), भागवत धोंडीबा गायकवाड (समता पार्टी), अ‍ॅड.महंमद जमीर शेख(अपक्ष), वाबळे भाऊसाहेब बापूराव (भारतीय जवान किसान पार्टी), नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष), कोठारी रवींद्र लिलाचंद (राष्ट्रीय जनमंच एस), अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष), महेंद्र दादासाहेब शिंदे (अपक्ष), गावडे मच्छिंद्र राधाकिसन (अपक्ष) यांचा समावेश असुन उमेदवारांना २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. १३ मे रोजी अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून रोजी जाहिर करण्यात येणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी कळविले आहे.

विखे यांच्या अर्जावरील आक्षेप निवडणूक अधिकार्‍यांना फेटाळला

नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे तसेच अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंके यांच्या अर्जावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपाध्यक्ष गिरीश जाधव यांनी आक्षेप घेतला. विखे फौंडेशनकडे महापालिकेची पाणीपट्टीची ४ कोटीची थकबाकी होती. त्यात महापालिकेने २०२१ रोजी ३ कोटीची सूट दिली. सुजय विखे व राधाकृष्ण विखे यांनी पदाचा गैरवापर करत हा लाभ मिळविला असल्याचा आक्षेप जाधव यांनी नोंदविला. तथापि ती थकबाकी विखे यांच्याकडे वैयतिक नसून ती संस्थेकडे असल्याचे स्पष्ट करत निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.