एसवायबीएच्या परीक्षेसाठी बसविलेले दोन ‘डमी’ परीक्षार्थी पथकाने पकडले

0
22

न्यू आट्‌र्स महाविद्यालयातील घटना; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर – द्वितीय वर्ष पदवी (एसवायबीए) परीक्षेसाठी हिंदीच्या पेपरला मूळ परीक्षार्थी ऐवजी २ डमी परीक्षार्थी बसविल्याचा प्रकार पारनेर येथील न्यु आर्ट्स महाविद्यालयात गुरुवारी (दि.२५) दुपारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघा युवकांवर शुक्रवारी (दि.२६) पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक महेंद्र साठे (रा. हंगा, ता.पारनेर) व अनिकेत दादाभाऊ टकले (रा. भोयरे पठार, ता.नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहेत. पारनेर येथील न्यु आर्ट्स महाविद्यालयात गुरुवारी (दि.२५) द्वितीय वर्ष पदवी परीक्षेचा हिंदी विषयाचा पेपर होता. या पेपरला मूळ परीक्षार्थी अक्षय चंद्रकांत कावरे याच्या ऐवजी प्रतिक महेंद्र साठे तर संग्राम चंद्रकांत कावरे याच्या ऐवजी अनिकेत दादाभाऊ टकले हे डमी परीक्षार्थी बसल्याचे महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आले. पर्यवेक्षण पथकाने या दोघांना पकडले. त्यांच्या विरुद्ध महाविद्यालयातील भाऊसाहेब साहेबराव नरसाळे (रा.संभाजीनगर, पारनेर) यांनी फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४१९ सह महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कलम ९ (३) (ब), १० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.