ड्रेनेजलाईनचे काम धोकादायक स्थितीत सुरु

0
104
oplus_32

 

स्टेशन रोडवरील इम्पिरियल चौक ते सक्कर चौक ते लोखंडी पूल (सीना नदी) दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले गटारीचे काम चालू आहे. गटार नसल्यामुळे उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी तुंबण्याचे तसेच येथील ड्रेनेज चोक-अप होण्याचे प्रकार नेहमी या भागात घडत असतात. हे काम करताना ठेकेदाराने खोदलेल्या नालीच्या बाजूला बॅरिकेटस् तसेच काम चालू असल्याचे सूचनाफलक सर्व बाजूने न लावल्याने येथे अपघात घडण्याची शयता आहे. सदर मार्ग हा छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग असल्याने नेहमी वाहनाची गर्दी असते.