ईद मिलनच्या माध्यमातून एकमेकांची संस्कृती व रितीरिवाज कळते : ॲड.अमीन धाराणी

0
11

‘गाता रहे मेरा दिल’ ग्रुप तर्फे सुरमई ईद मिलन

नगर. भारतात अनेक जाती जमाती व धर्माचे लोक राहतात. त्यांची वेगवेगळी संस्कृती व रीतीरिवाजा आहे. ते समजून घेण्यासाठी एकमेकांच्या सणासुदी निमित्त एकमेकांना बोलावून पाहुणचार केल्यामुळे त्यांच्या समाजाची रीतीरीवाज व संस्कृती कळते. रमजान ईद सारखा सण हा ईद मिलनच्या माध्यमातून इतरांनाही कळावे या हेतूनेच हा सुरमई ईद मिलन आहे असे प्रतिपादन गाता रहे मेरा दिल ग्रुपचे अ‍ॅड. अमिन धाराणी यांनी केले. रमजान ईद निमित्त गाता रहे मेरा दिल ग्रुपचे अमीन धाराणी व अ‍ॅड. गुलशन धाराणी यांनी गोविंदपुरा येथे संगीतमय ईद मिलनाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व संगीतप्रेमींना त्यांनी आमंत्रित करून शीरखुर्मा व स्नेहभोजनाचे आयोजन केले. यावेळी डॉ. दर्शन गोरे व सौ गोरे, अ‍ॅड. उषा जगदाळे, हर्षल पटेल, पवन नाईक, डॉ. संतोष चेडे, डॉ. रेश्मा चेडे, सुनील भंडारी, जयश्री साळवे, दीपा भालेराव, सुनील हळगावकर, डॉ. शैलेंद्र खंडागळे, किरण उजागरे, रामण्णा, राजू क्षेत्रे, तन्नु महाराज, मुख्तार शेख, विकास खरात, रंजीत उजागरे उपस्थित होते. यावेळी सर्व संगीत प्रेमींनी अनेक वेगवेगळे संदेश देणार्‍या गीतांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या संगीतमय ईद-मिलानाच्या वेगळ्या पणाचे आयोजन बद्दल सर्वांनी एड. अमीन धाराणी व गुलशन धाराणी या दाम्पत्याचे भरभरून कौतुक केले. अशा उपक्रमामुळे एकमेकांच्या समाजाबद्दल असणारे गैरसमज दूर होऊन एकोपा वाढीस मदत मिळते असे अनेक उपस्थितांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सुरमई ईद मिलनाचा समारोप अ‍ॅड. गुलशन धाराणी यांनी आभार व्यक्त करून केले.