नगर – भारतीय संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदार जागृती अभियानात मेहेर इंग्लिश स्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदान करूया देशाचे उज्वल भवितव्य घडवूया, असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका प्रा.अनुरीता झगडे यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलच्या वतीने बसस्थानका जवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पथनाट्य सादर करून मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पथनाट्याची सुरुवात करण्यात आली. मतदार राजा जागा हो लोकशाहीचा तु धागा हो. हे ब्रीदवाय घेऊन व आचारसंहितांचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून पथनाट्य सादर करण्यात आले.
मेहेर इंग्लिश स्कूलचे पथनाट्यातून मतदार जागृती अभियान
या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन जगदीश झालानी व हिंद सेवा मंडळाच्या पदाधिकार्यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.अनुरीता झगडे, मोनिका बामदळे, गीता वल्लाकट्टी, अश्विनी रक्ताटे, शीतल दळवी, विमल आवारे, ऐमन बागवान, समीना शेख, विनिता पटवेकर, आशा घोरपडे, किरण साठे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.