नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत १० पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

0
19
xr:d:DAFxmHQq_I0:4,j:7596853073487503777,t:23101814

 

नगर – पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राज्यातील ८०० पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक देऊन महाराष्ट्र दिनी गौरविण्यात येणार आहे. यात नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणार्‍या १० पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांनी ही यादी जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे. नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गंगाधर सुपेकर, सुभाष जगन्नाथ दैमिवाल, सुनील चिमाजी पवार, पोलीस हवालदार रवींद्र सुरेश पांडे, योगेश मनोहर गोसावी, मोहन पांडुरंग शिंदे, चालक पोलीस हवालदार संभाजी दादाभाऊ कोतकर, बाबासाहेब काशिनाथ भोपळे, बाबासाहेब भानुदास फसले, शकोर उस्मान सय्यद या १० जणांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार्‍या समारंभात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याहस्ते हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.