केडगावमध्ये आई व मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण

0
18

नगर – केडगाव उपनगरातील भूषणनगर येथील राध्येशाम चौकात वृद्ध महिला व तिच्या मुलाला तिघांनी लाकडी दांडयाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) सकाळी घडली. या मारहाणीत राजेंद्र भाऊसाहेब सातपुते व त्यांची आई गुंफाबाई सातपुते हे दोघे जखमी झाले आहेत. राजेंद्र सातपुते हे शुक्रवारी सकाळी भूषणनगर येथे आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यास तुम्ही रस्त्याचे काम बंद का केले, ही जागा आमची आहे, आमची काम करण्यास काहीही हरकत नाही. तुम्हाला कोणी विरोध करत आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी तेथे विजय मोहन पठारे, राजेंद्र मोहन पठारे व पूजा विजय पठारे आले व त्यांनी राजेंद्र सातपुते यांना शिवीगाळ करत लाकडी दांडयाने मारहाण सुरु केली. तेव्हा गुंफाबाई या भांडण सोडवायला आल्या असता त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे राजेंद्र सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध भा.दं. वि.कलम ३२४, २९४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.