‘अभिरूप न्यायालया’च्या माध्यमातून विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वकिली व्यवसायाची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे : न्या राजेंद्र अवचट

0
17

नगर – विधी महाविद्यालयाने अभिरूप न्यायालय आयोजित करून विद्यार्थ्यांना वकिली व्यवसायाची कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चांगला वकील होण्यासाठी या व्यवसायाची तंत्रे आणि कौशल्ये विकसित करावीत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेंद्र अवचट यांनी केली. अहमदनगर न्यू लॉ कॉलेजमध्ये न्यायमूर्ती कै. एस. बी. म्हसे पा. सहाव्या राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेंद्र अवचट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, तसेच व्यासपीठावर सचिव अ‍ॅड. विश्वासराव आठरे पा., खजिनदार अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे, प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, दीपक दरे, अ‍ॅड. माणिक मोरे, प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, स्पर्धा समन्वयक प्रा. विजयकुमार शिंदे उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्याचा आढावा मांडून संस्थेचा शैक्षणिकदृष्ट्या आलेख उंचावत चाललेला आहे, तसेच संस्थेच्या उभारणीत वकिलांचा फार मोठा सहभाग आहे. अशा अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट वकील घडविण्याचे काम होत असते, तसेच प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटन समारंभात दीपप्रज्ज्वलन करून कै. न्यायमूर्ती एस. बी. म्हसे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत अ‍ॅड. माधवेश्वरी म्हसे यांनी करताना कै. न्यायमूर्ती एस. बी. म्हसे पाटील यांच्याविषयी माहिती देताना म्हसे पाटील यांनी शेतकरी, कामगार यांच्यासाठी निःस्वार्थीपणे योगदान देताना वकिली व्यवसायाची उंची वाढविली आणि विविध संस्थांवर काम करताना अभ्यासपूर्ण आपले म्हणणे न्यायव्यवस्थेसमोर मांडून गरीबांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. बी. डी. पांढरे यांनी करून दिली, तसेच आभार प्रदर्शन प्रा. सुहास तोरडमल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे यांनी केले. संयोजन समितीचे अ‍ॅड.सुभाष भोर, आर्किटेट सौ. राजेश्वरी जगताप, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सतीश पाटील, सौ. अलका जंगले, श्रीमती निर्मला काटे, अ‍ॅड. नरेश गुगळे, अ‍ॅड. अशोक कोठारी, अ‍ॅड. शहाजी दिवटे, प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, अभिरूप न्यायालयाचे न्यायाधीश आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. बी. डी. पांढरे, डॉ. अतुल मोरे, प्रा. गिरीश हिरडे, प्रा. आर. डी. भवाळ, डॉ. आर. बी. दुसुंगे, कार्यालयीन अधीक्षक परशुराम म्हस्के, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.