शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह ‘अवकाळी पाऊस’

0
28

नगर – विजांच्या कडकडाटासह झालेला अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळाने बुधवारी (दि.२५) रात्री दक्षिण नगर जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपून काढले. शेवगाव, कर्जत आणि पाथर्डी तालुयात विजा पडून ३ जनावरे मयत झाली तर वादळात घराचे पत्रे उडाल्याने ते अंगावर पडून शेवगाव मध्ये १ महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. शेती माल आणि फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने सुरु केले आहेत.

नगर जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून विविध भागात अवकाळी पाऊस होत आहे. मागील बुधवारी (दि. १७) दुपारनंतर अवकाळी पाऊस आणि सोबत जोरदार वादळाने जिल्ह्याच्या अनेक भागात चांगलीच दाणादाण उडवली होती. त्यानंतर काल बुधवारी रात्री जिल्ह्याच्या दक्षिण भागात पुन्हा वादळ अन अवकाळी पाऊस झाला. या वादळाचा सर्वाधिक फटका पारनेर, नगर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या तालुयांना बसला आहे. वीज कोसळून शेवगाव तालुयात १ म्हैस, कर्जत व पाथर्डी तालुयात प्रत्येकी १ गाय असे ३ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. शेवगाव तालुयात घरावरील पत्रे उडून गेल्याने ते अंगावर पडून एक महिला जखमी झाली आहे.