कत्तलीसाठी चालविलेल्या ३९ जनावरांची पोलिसांनी केली सुटका

0
18

केडगाव बायपास येथे पकडला टेम्पो

नगर – कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय जनावरांचा टेम्पो कोतवाली पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि. २५) सकाळी केडगाव बायपास येथे पकडला असून टेम्पोत दाटीवाटीने कोंबलेल्या ३९ जनावरांची सुटका करण्यात आली आहे. तर टेम्पोत ८ वासरे गुदमरून मयत झाल्याचे आढळून आले. टेम्पो चालक मोसिम मुस्ताक कुरेशी (वय ४०, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट अहमदनगर) यास टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुरुवारी सकाळी माहिती मिळाली की, गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी एका आयशर टेम्पोत ही जनावरे दाटीवाटीने कोंबून नगर पुणे महामार्गाने नगर शहरात आणली जात आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाला केडगाव बायपास चौकात कारवाई साठी पाठविले. या पथकाने सकाळी ९.३० च्या सुमारास तेथे जावून सापळा लावला. थोड्याच वेळात एक संशयित आयशर टेम्पो येताना दिसला. पथकाने टेम्पो चालकाला थांबवले व टेम्पोची पाहणी केली असता त्यात एकूण ४७ गोवंशीय जनावरे आढळून आली. त्यातील ८ वासरे मयत असल्याचे दिसून आले. पोलिस पथकाने टेम्पो चालक मोसिम मुस्ताक कुरेशी याच्या कडे चौकशी केली असता ही जनावरे समीर शेख (रा. कसाई मोहल्ला, सुपा) यांचे मालकीचे असुन ते झेंडीगेट येथे कत्तलीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले.

पोलिस पथकाने ३९ जिवंत गोवंशीय जातीची जनावरे, ८ मयत वासरे व आयशर टेम्पो असा एकुण १० लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील स.पो.नि. योगीता कोकाटे, पो. हे.कॉ. शाहीद शेख, ए. पी. इनामदार, पो.ना. अविनाश वाकचौरे, महिला पो. ना. संगिता बडे, पो.कॉ. सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सुरज कदम, अतुल काजळे, दिपक रोहोकले, सचिन लोळगे, कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय जनावरांचा टेम्पो पकडल्यानंतर त्याच्या समवेत कोतवाली पोलिसांचे पथक. ढाकणे यांच्या पथकाने केली आहे.