महामार्ग व ‘बायपास’च्या सर्व्हिस रस्त्यांना मुहूर्त मिळेना; नागरिकांसह शाळकरी मुलांना होतोयं प्रचंड ‘मनस्ताप’

0
88

नगर – लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काही दिवस अगाेदर माेठया थाटात लाेकार्पण झालेल्या नगर-साेलापूर महामार्गासह बाह्यवळण रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच असून, महामार्गावरील अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्त्यांना अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसत आहे. सर्व्हिस रस्त्याअभावी महामार्गालगत असणाèया गावातील नागरिकांची तसेच शाळकरी मुलांची हेळसांड हाेत आहे. महामार्गांवर उड्डाणपूल असणाऱ्या बऱ्याच गावांतील सर्व्हिस रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. महामार्गावरील साकतखुर्द, शिराढाेण या ठिकाणी अजूनही एका बाजूचे सर्व्हिस राेड पूर्ण झालेले नाही. सर्व्हिस रस्ता नसल्याने महामंडळाच्या एसटी बस उड्डाणपुलावरून जात आहेत. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुलांना खांद्यावर दफ्तराचे ओझे घेऊन अर्धा किलाेमीटरची पायपीट करावी लागत आहे. तसेच नगर येथे दैनंदिन कामासाठी जाणारे चाकरमानी, वृद्ध नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी यांनासुद्धा एक किलाेमीटरची पायपीट करत थेट दहिगाव येथे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी सूचना फलक, दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. बाह्यवळण रस्ता उंच बनवण्यात आल्याने निंबळक, नेप्ती, अरणगाव आदी गावातील शेतकèयांना शेतात जाण्यासाठी अडथळे निर्माण हाेत आहेत. याशिवाय वाळुंज तसेच नारायणडाेह येथील रेल्वे क्राॅसिंग पुलाचे काम अजूनही अपूर्णच आहे. एमआयआरसी येथील भुयारी मार्गाचे काम सध्या चालू आहे. तर दहिगाव येथील भुयारी मार्गाचे कामही पूर्ण झालेले नाही. महामार्गाची कामे अपूर्ण असताना घाईघाईत लाेकार्पण साेहळा साजरा केल्याने नगर-साेलापूर महामार्गाबद्दल ’असून अडचण अन् नसून खाेळंबा’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे. दरम्यान नगर येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लाेकार्पण साेहळा नुकताच माेठया थाटात पार पडला. बाह्यवळण रस्त्यासह महामार्गाचे काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डाेळ्यासमाेर ठेऊन रस्ता उद्घाटनाचा फार्स झाल्याची चर्चा हाेत आहे.

शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ

साकतखुर्द येथे अजूनही एक साईडचा सर्व्हिस रस्ता नसल्याने महामंडळाच्या एसटी बस उड्डाणपुलावरून जात आहेत. त्यामुळे शाळेतून परतलेल्या मुलांना उड्डाणपुलाच्या पायथ्याला उतरवले जात आहे. तेथे उड्डाणपुलाचा उतार असल्याने वाहने भरधाव वेगाने जातात. या उताराला अतिशय धाेकादायकरित्या रस्ता क्राॅस करून मुले गावाच्या दिशेने प्रवेश करतात. त्यामुळे मुलांच्या जीवाशी हा एकप्रकारे खेळच असून, एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे हाेणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित हाेत आहे.

गाव एकिकडे अन् बसथांबा भलतीकडे

नुकतेच लाेकार्पण झालेल्या साेलापूर महामार्गांवर बहुतांश ठिकाणी गावापासून बèयाच अंतरावर बस थांबे बांधण्यात आली आहेत. महामार्गांवरील साकतखुर्द, शिराढाेण, वाळुंज, तुक्कडओढा याठिकाणी एका साईडने गाव साेडून बèयाच अंतरावर बसथांबे बांधण्यात आली आहेत. यातील बरीच बसथांबे निर्जन ठिकाणी बांधली आहेत. गाव साेडून भलतीकडे हे बसथांबे का बांधले असावे हे न उलगडणारे काेडे आहे. परंतु यामुळे मात्र प्रवास करणाèया नागरिकांची पायपीट वाढली असून, निर्जन ठिकाणी बांधलेल्या बसथांब्यामुळे महिला, तसेच शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढणार आहे.

गावकऱ्यांसाठी अपघातांचा धाेका वाढला

महामार्गावर रुईछत्तीसी येथे बाह्यवळण रस्ता करण्यात आला आहे. या गावात दर रविवारी माेठा बाजार भरताे, तसेच शाळा, महाविद्यालय, बँक आदींमुळे तेथे शेजारील वाटे\ळ, साकत, दहिगाव तसेच नगरहुन येणारांची संख्या जास्त आहे. बाह्यवळण रस्त्याजवळ गावात प्रवेश करताना धाेकादायकपणे रस्ता ओलांडून गावात प्रवेश करावा लागणार असल्याने भविष्यात या ठिकाणी अपघात झाल्यास नवल वाटू नये. त्यामुळे रुईछत्तीसीकरांसाठी ही एक प्रकारची धाेक्याची घंटाच आहे.