दैनिक पंचांग गुरुवार, दि. २५ एप्रिल २०२४

0
5

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र कृष्णपक्ष, विशाखा २६|२४
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य :

मेष : व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आजचा दिवस
महत्वपूर्ण मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी घेऊन येईल. विरोधक करार करतील. काळजीपूर्वक काम
करा.

वृषभ : आपला एखादा मित्र आपल्या विचारांबद्दल महत्वपूर्ण सल्ला देऊ शकतो.
एखादी विषम परिस्थती उद्भवण्याआधी आपली आर्थिक स्थिती तपासून पाहा. व्यापारात
बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल.

मिथुन : काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. आपल्या
नवीन आवडींना प्रोत्साहन द्या आणि जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्या. आरोग्य
नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल

कर्क : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी
देईल परंतु घाई करणे अडचणीत टाकू शकते. अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव
अडचणी राहतील.

सिंह : आज रात्री विश्रांती घ्या. रहाते घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनकराहील. आर्थिक लाभ होईल. कोणतेही काम
एखाद्यावर विसंबून राहून करू नका.

कन्या : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण
करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. वेळ
मनोरंजनात व्यतीत होईल.

तूळ : घरगुती बाबतीत अधीरता टाळा. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे.
सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. मित्रांकडून आर्थिक
लाभ होईल.

वृश्चिक : ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य
विचार करून कार्य करा. वडीलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळेल. वाहने काळजीपूर्वक
चालवा. शत्रूंपासून सावध राहा.

धनु : निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात
वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात
सुख मिळेल.

मकर : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर
आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. मुलांवर खर्च होईल. मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये
सहजपणा राहील.

कुंभ :  अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ
आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. व्यापार व्यवसायात
सावध राहाणे आवश्यक. शत्रूंना भीती वाटेल.आनंद वाढेल.

मीन :  पत्नी व मुले यांच्या सहवासामुळे मानसिक शांतता लाभेल. आपले इप्सित
साध्य होण्याचे योग येतील. वस्तू व पैसे जपून वापरावेत. चोरी होण्याची शयता आहे.
देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर