गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह तरुणास पकडले

0
83

नगर – गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्याच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह 1 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. नगर पुणे राेडवरील बेलवंडी ाटा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. विकास रमेश पठारे (वय 30, रा. मावळेवाडी, ता. पारनेर) असे आराेपीचे नाव आहे. आगामी लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पाे.नि. दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यामध्ये अवैध हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पाे.नि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पाेलीस अंमलदार संताेष लाेढे, रविंद्र कर्डीले, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमाेल काेतकर, संताेष खैरे यांचे पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले हाेते. हे पथक साेमवारी (दि.22) अवैध शस्त्रांची माहिती काढत असतांना माहिती मिळाली की, गुलाबी रंगाचा फुलबाहीचा शर्ट व निळे रंगाची जिन्स पँट घातलेला एक इसम हा गावठी कट्टा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगुन असुन ताे बेलवंडीफाटा येथे थांबलेला आहे. ही माहिती मिळताच पथकाने तात्काळ नगर – पुणे जाणारे राेडवरील बेलवंडी फाटा या ठिकाणी जावुन बातमीतील वर्णनाचे इसमाचा शाेध घेत असतांना गुलाबी रंगाचा फुलबाहीचा शर्ट व निळे रंगाची जिन्स पँट घातलेला एक इसम बेलवंडी ाटा या ठिकाणी बेलवंडी गावाकडे जाणारे राेडचे कडेला थांबलेला दिसला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव विकास रमेश पठारे (वय 30, रा. मावळेवाडी, ता. पारनेर) असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेता त्याचे डावे कमरेस खाेचलेले 30 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व मॅग्झिनमध्ये 1 हजार रुपये किमतीचे 1जिवंत काडतुसे असा एकुण 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. त्याचेकडे मिळुन आलेल्या पिस्टलबाबत विचारपुस करता त्याने ते विक्री करण्याकरीता आणले असल्याचे सांगितले. त्याच्याविरुद्ध बेलवंडी पाेलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कायदा कलम 3/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.