मागील लोकसभेत नगर दक्षिणेतील जनतेने तुमची लेव्हल दाखवून दिली

0
135

ज्यांच्याकडून पराभव झाला त्यांचाच झेंडा हातात घेण्याची वेळ तुमच्यावर आली ; निलेश लंके यांची लेव्हल काढणाऱ्यांनी स्वत:ची लेव्हल तपासावी 

नगर – नगर दक्षिण लाेकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी लाेकसभेचे विराेधी उमेदवार निलेश लंके यांच्याबद्दल बाेलणार नाही, त्यांची तेवढी लेव्हल नसल्याचे वक्तव्य केले. शहराच्या आमदारांचे हे वक्तव्य वै\ल्यातून आलेले आहे. मुळात लंके यांची लेव्हल काय आहे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओळखली म्हणूनच त्यांना लाेकसभेची उमेदवारी दिली. उलट तुम्हाला शरद पवारांनी मागील वेळी लाेकसभेची उमेदवारी दिली तेव्हा नगर दक्षिणेतील जनतेने तुम्हाला तुमची लेव्हल दाखवून दिली. ज्यांच्याकडून लाेकसभेला माेठा पराभव झाला त्यांचाच झेंडा हातात घेण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. निलेश लंके यांना मतदारसंघात मिळणारा उत्स्ूर्त प्रतिसाद, त्यांची प्रचंड लाेकप्रियता यामुळे महायुतीतील सगळेच चिंतेत पडले आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापाैर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.

अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे की, निवडणुकीसाठी निलेश लंके यांच्यासारख्या लाेकप्रिय आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून विराेधक त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष्य करीत आहेत. लंके यांची लेव्हल काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वास्तविक लंके यांना जनसंवाद यात्रेतून सर्वसामान्य मतदारांनी दिलेले पाठबळ पाहून विराेधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. लंके यांना वैयक्तिक टार्गेट करूनही जनता त्यांनाच डाेक्यावर घेत आहे हे पाहून टिका करताना विराेधकांची लेव्हल घसरत आहे. तुतारीचा गजर नगर दक्षिण लाेकसभा मतदारसंघात परिवर्तन घडविणार हे जवळपास निश्चित झालेले आहे. त्यामुळे केवळ आपल्या महायुतीच्या उमेदवारापुढे खूप काम करताेय असे दाखविण्याची धडपड शहराचे आमदार करीत आहे. यातून काहीही साध्य हाेणार नाही. यावेळी नगर शहरातूनही लंके यांना प्रचंड मताधिक्य मिळेल असा विश्वास कळमकर यांनी व्यक्त केला आहे.