न्याय मिळण्यासाठी नाभिक समाजाच्या नेत्यांनी पक्षाच्या सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे

0
19

कल्याण दळे यांचे आवाहन; महाराष्ट्र नाभिक महामंडळाची वार्षिक सभा

नगर – नाभिक समाजाला न्याय देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपली संघटना कार्यरत आहे. संघटनेच्या ताकदीमुळे राजकीय पक्षांना नाभिक समाज कसा एकत्रित आहे हे समजले. त्यामुळेच त्यांनी आपल्या समाजाच्या नेत्यांना विविध पक्षाच्या सेलपदी नियुत्या दिल्या. त्यामुळे पक्ष आणि संघटना वाद निर्माण होतो. आपल्या समाजाच्या नेत्यांनी अशा पक्षांच्या सेलचे पदाधिकारी असणार्‍यांनी राजीनामे द्यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी केले. नगर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, सचिव पांडूरंग भवर, एकलव्य संघटेनेचे शिवाजी ढवळे युवा प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे, कर्मचारी संघटनेचे उत्तम सोलाणे, महिला प्रदेशाध्यक्षा भारती सोनवणे, महिला सरचिटणीस अ‍ॅड.मोनिका निकम, रोहिणी बनकर, वनिता बिडवे आदि उपस्थित होते. श्री.दळे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजाला न्याय द्यायचा असेल तर संघटनेत काम करा. सेलच्या, पक्षांचे राजीनामे द्यायची धमक दाखवा व संघटनेचे काम करा, असे आवाहन करुन शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत आढावा घेण्यात आला. कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता विधानसभेत आपले किमान १० आमदार तरी निवडून येतील, असा विश्वास श्री.दळे यांनी व्यक्त केला. यावेळी कल्याण दळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक पदाधिकार्‍यांनी समाजासाठी आम्ही पक्ष, सेलचे राजीनामे देऊ आणि संघटनेत काम करुन आपली ताकद दाखवू, असे जाहीर केले. २०२४ ते २०२९ या पाच वर्षासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी कल्याण दळे, कार्याध्यक्षपदी दामोदर बिडवे, सरचिटणीसपदी पांडूरंग भवर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.

या निवडीचे सर्वांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उपाध्यक्ष अनिल निकम, प्रदेश उपाध्यक्ष माऊली गायकवाड, बापूसाहेब भागवत, संभाजी गवळी, अनिल औटी, निलेश पवळे, विशाल सैंदाणे, अजय रंधवे, संतोष जाधव, सागर साळूंखे, आशिष ताकपिरे, बबन काशिद, सतीश साळूंखे, बाबूराव दळवी, रमेश बिडवे, बाबुराव ताकपिरे, भाऊ बिडे, शाम जाधव, शाम साळूंखे, सुनिल आतकर, विजय क्षीरसागर, सागर शिंदे, कांतीलाल कोकाटे, सुशिल थोरात, वामन औटी, नंदकुमार औटी, श्रीपाद वाघमारे, सिद्धांत झेंडे, मनोज शिंदे, मनोज नन्नवरे, निलेश शिंदे आदिंनी घेतले. या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक बाळासाहेब भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी गवळी यांनी केले तर आभार अनिल निकम यांनी मानले.