आनंदऋषीजी हॉस्पिटलचे निस्वार्थपणे मानवसेवेचे कार्य कौतुकास्पद : उमेश पगारिया

0
23

सौ.तेजल पगारिया यांचा जन्मदिन आरोग्य शिबीराने साजरा 

नगर – आचार्य आनंदऋषीजींची प्रेरणा घेऊन जैन सोशल फेडरेशनच्या सदस्यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे छोटे रोपटे लावले. आज ते वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ज्या समाजात आपण राहतो. त्या समाजाचे देणे लागतो.या सद्भावनेतून जैन सोशल फेडरेशनचे सदस्य निस्वार्थपणे रुग्णसेवेचे कार्य करीत आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये परमेश्वर असल्याने तसेच औषधोपचारांसोबतच डॉटर्स व परमेश्वरासारखी त्यागाच्या भावनेतून काम करणारी माणसं येथे कार्यरत असल्याने येथे येणारा रुग्ण बरा झाल्याशिवाय राहत नाही. निस्वार्थपणे मानवसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उद्योजक उमेश पगारीया यांनी केले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे सौ.तेजल राज पगारीया यांच्या जन्मदिना निमित्त बालरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन आयोजक उमेश पारसमल पगारीया (नागपूर) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी सौ सुजाता पगारिया, सौ.तेजल पगारिया, बाळासाहेब (कर्नावट) कोयळीकर (पुणे), सौ.आशा कोयळीकर, उद्योजक पेमराज बोथरा, सतीश बोथरा, वैशाली जैन, उमेश जैन (मुंबई), दीपक शिंगवी, सौ.स्मिता सिंगवी, डॉ.मोनिका लोढा, संदीप लोढा, किरण बोरा, शांतीलाल बोरा, संतोष बोरा, मनोज बोरा, अशोक बोरा, राजेंद्र बोरा, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, निखिलेंद्र लोढा, सतीश लोढा, वसंत चोपडा, सुनील मालू, शिबिराचे तज्ञ डॉ.श्रेयस सुरपुरे, डॉ.सोनाली कणसे, डॉ.रुपेश सिकची, डॉ.वैभवी वंजारे आदी उपस्थित होते. उद्योजक पेमराज बोथरा म्हणाले, स्व.मानकचंद बोथरा यांनी परिवाराला दिलेल्या समाजसेवेची परंपरा सौ.तेजल पगारिया यांनी पुढे चालवली आहे.

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जन्मदिन साजरा करून आगळावेगळा वाढदिवस साजरा केला आहे. या शिबिरामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळेल. डॉ.मोनिका लोढा म्हणाल्या, सौ.तेजल पगारीया यांनी जन्मदिनाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन कुठल्याही प्रकारची पार्टी न करता आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य केले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य महान आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल मुळे अनेक रुग्णांच्या यशस्वी शास्त्रक्रिया करण्यात आले आहे.तसेच सवलतीच्या दरात व मोफत रुग्णसेवा मिळत असल्याने याचा फायदा अनेक रुग्णांना होतो. प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले, समाजातील दानशूर व्यक्तींमुळेच आनंदऋषीजी हॉस्पिटलचे मोठे कार्य उभे राहिले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे बालरोग विभागात एनआयसीयु १६ बेडचा अत्याधुनिक विभाग आहे.येथील तज्ञ डॉटरांचा दहा वर्षाचा अनुभव असल्याने बालकांचे आरोग्य चांगले व्हावे. दीर्घायुष्य मिळावे. यासाठी प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा फायदा समाजाला मिळावा. यासाठी अत्याधुनिक बालरोग विभाग कार्यरत आहे. शिबिरात १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार निखिलेंद्र लोढा यांनी मानले.