ओबीसी बहुजन पक्षाच्या उमेदवाराला शहरातील ओबीसी समाजाचा पाठिंबा

0
11

नगर – मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरुन खदखद असताना त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसत आहे. नुकतीच शहरात ओबीसी समाजाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यामध्ये ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेले नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार दिलीप कोंडिबा खेडकर यांना पाठिंबा देण्यात आला. दिलीप खेडकर हे निवृत्त आयएस अधिकारी असून, त्यांच्या माध्यमातून एक सक्षम व सुशिक्षित उमेदवार पर्याय म्हणून नागरिकांना मिळाला आहे. प्रशासनातील माजी अधिकारी असलेले खेडकर यांना मताधियाने निवडून आणण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी बैठकीत प्रमुख पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.