समाजामध्ये काहीजण पैसा मिळावा म्हणून देवाची भक्ती करत असतात : ह.भ.प. बापू महाराज लोंढे

0
15

नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंती निमित्त कीर्तन

नगर – भगवंताचे नाम चिंतन केल्यावर कुठलेही संकट मनुष्यावर येत नाही वाल्याय्कोळ्याचा उद्धार झाला तो फक्त नाम चिंतनाने. आपण जे काम करत असतो त्या कामाच्या वेळी देखील भगवंताचे नाव घेऊ शकतो. आपल्या कामात देखील परमेश्वर असतो. आपल्याबरोबर संपत्ती येणार नाही तर आपण समाजामध्ये केलेल्या चांगल्या कामाची पावती बरोबर येणार आहे. आपण समाजामध्ये वावरत असताना आपला मार्ग चुकला की धोका निर्माण होत असतो. समाजामध्ये काहीजण पैसा मिळावा म्हणून देवाची भक्ती करत असतात या भक्तीचा काही उपयोग नाही.तर अंतकरणापासून देवाची भक्ती करा. समाजामध्ये काम करीत असताना अहंकार बाजूला ठेवून काम करावे, असे प्रतिपादन ह.भ.प.बापू महाराज लोंढे यांनी केले. नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने ह.भ.प. बापू महाराज लोंढे यांचे कीर्तन झाले. यावेळी नालेगाव ग्रामस्थ उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगली पिढी निर्माण होत असते यासाठी सालाबाद प्रमाणे नालेगाव गाडगीळ पटांगण येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे. आजची युवा पिढी धार्मिकते पासून लांब चालली आहे. त्यांना संत महंतांच्या विचाराची खरी गरज आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम होत असते. अशी माहिती माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी दिली.