रस्त्यावरील बंद वाहनांसह अतिक्रमणे हटविण्यासाठी मनपा आयुक्त रस्त्यावर

0
36

नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या . अतिक्रमण विभाग, प्रभाग समिती क्रमांक ३ आणि आरोग्य विभागाच्या वतीने प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या उपस्थितीत विशेष मोहिम राबविण्यात आली असून, या अंतर्गत जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते पोस्ट ऑफिस चौक आणि शासकीय विश्रामगृह रस्त्यावरील बंद चारचाकी वाहने, भंगार साहित्य हटविण्यात आले. शहरातील रस्त्यांवर बंद असलेली वाहने नागरिकांनी दोन दिवसात हटवावेत अन्यथा महापालिकेच्या वतीने सदर वाहने जमा करून घेण्यात येतील व दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच शहरातील चौपाटी येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी डस्टबिनचा वापर करावा. ओला व सुका कचरा वेगळा करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कचरा टाकू नये. असे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले. यावेळी प्रभाग अधिकारी अशोक साबळे, अतिक्रमण विभागाचे रिजवान शेख, देविदास बिज्जा, स्वछता निरीक्षक तुकाराम भांगरे, राजेश तावरे, बाळासाहेब विधाते, प्रसाद उमाप, संदीप चव्हाण, प्रशांत रामदिन उपस्थित होते.