लग्न समारंभाच्या गडबडीत घरातून ७ तोळे सोन्याची चोरी

0
62

नगर – घरात लग्न समारंभाची गडबड सुरु असताना कपाटात ठेवलेले ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना गुलमोहर रोडवरील नवले नगर येथे घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंजुषा संजय आठरे (रा. नवलेनगर, गुलमोहर रोड) यांनी गुरुवारी (दि.१८) रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आठरे यांच्या घरात मागील महिन्यात लग्न समारंभ होता. त्या गडबडीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील बेडरूम मधील कपाटातून ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक महागडे घड्याळ चोरून नेले. लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रम उरकल्या नंतर त्यांनी कपाटातील दागिने पाहिले असता ते त्यांना दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ते न मिळून न आल्याने त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं. वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.