मोरया युवा प्रतिष्ठानचा ‘पक्षी वाचवा अभियान’

0
17

नगर – शहरातील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने भिंगार येथील श्री शुलेश्वर देवस्थान परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करून पक्ष्यांसाठी प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच खाद्याचीही सोय करण्यात आली. गुरुवार (दि.१८) हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरासह जिल्ह़्याच्या ग्रामीण भागातही तापम ानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने वाढत्या उष्म्याचा परिणाम मानवाबरोबर पशु-पक्ष्यांवरही होत आहे. पशु-पक्ष्यांना त्याचा अधिक त्रास होत आहे. वाढत्या तापमानामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकून गंभीर जखमी होणे अथवा पाण्याअभावी तडफडून मरणे, असे गंभीर प्रकार पक्ष्यांबाबत घडत आहेत. चिमण्या, पारवे, कावळे, कोकीळ उष्माघाताने बळी पडत असल्याचे अनेक ठिकाणी आपल्याला आढळून येते. ’चिमण्यांसह अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्याच बरोबर वृक्षतोड, मोबाईल टॉवर आणि इंटरनेटमुळे पक्ष्यांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. आजूबाजूला दिसणारे चिऊ-काऊही दुर्मीळ झाले आहेत.

मोबाईल रेंजमुळे पक्ष्यांचे जीवन धोयात आले आहे. अशा परिस्थितीत पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबाने पक्षी वाचवा मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची गरज आहे, अन्यथा भावी पिढीला पक्षी केवळ छायाचित्रातच दाखवावे लागतील’, असे प्रतिपादन मोरया युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईश्वर पवार यांनी केले आहे. तसेच ‘जिथे घर, तिथे पक्षी पाणवठा’ ही संकल्पना राबविणे आवश्यक असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. श्री शुलेश्वर देवस्थान परिसरात पक्ष्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधेप्रमाणे इतर ठिकाणीही नागरिकांनी पक्ष्यांसाठी सुविधा कराव्यात. त्यामध्ये घर तसेच बागांमध्ये मातीची उथळ भांडी पाण्याने भरून ठेवणे, शय झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसविणे, घराच्या परिसरातील गच्ची, बाल्कनीत पक्ष्यांसाठी खाण्याची सोय करणे, कृत्रिम पाणवठ़यातील पाणी वेळोवेळी बदलणे, भांडे स्वच्छ ठेवणे, पिण्याचे भांडे खोलगट नव्हे, तर पसरट ठेवणे या सुविधा करता येणे नागरिकांना सहज शय असल्याचे मोरया युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष स्वामी टाकळकर यांनी म्हटले आहे.

घरटी न तोडण्याचे आवाहन

शहरातील बहुतेक नागरिक हे साफसफाई करताना त्यांच्या घरात अथवा इमारतीतील पक्ष्यांची घरटी काढून टाकतात. त्यामुळे आधीच झाडावर घरटे करू न शकलेल्या या पक्ष्यांचा निवारा काढला जातो. निवार्‍याचा पर्याय न मिळाल्याने ते उन्हाचे बळी ठरतात. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांनी इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नये, शय झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवावी, असे आवाहनही मोरया युवा प्रतिष्ठानचे सागर शर्मा, अतीश शिंगरे, धिरज पोखरणा, मनोज लुनिया आणि सर्व सदस्याच्या वतीने करण्यात आले आहे.