जिल्ह्यातील ‘गोशाळांची’ चारा-पाण्याची सोय करण्याचे आदेश टंचाई निवारण कक्षास द्यावेत : इंजि. यश शहा

0
11

नगर- निमल वेल्फेअर बोर्ड भारत सरकार एच ए डब्ल्यू आर सदस्य तसेच राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष अखिल भारतीय जैन दिवाकर मंच, नवी दिल्ली व अहमदनगर जिल्हा कोऑर्डिनेटर -समस्त महाजन व आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट या नात्याने इंजि. यश शहा यांची जिल्ह्यातील जवळपास सर्वच पांजरापोळ, गोशाळांना वैयक्तिक भेटी दिल्या.या भेटीदरम्यान चारा टंचाई व पाणी टंचाई ची अतिशय गंभीर परिस्थिती प्रकर्षाने जाणवली. शहा यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवले आहे. जिल्हा चारा टंचाई नियंत्रण कक्षास तसेच आपत्ती निवारण जिल्हा कक्ष, पशुसंवर्धन विभाग व इतर संबंधित विभागांस अतिशय गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थिती मुळे तात्काळ सूचना कराव्यात की जिल्ह्यातील पांजरपोळ व गोशाळा यांना त्यांच्याच गोशाळेत आहे त्या ठिकाणी चारा तथा पाण्याची सोय, औषधांचे व इतर वैद्यकीय सेवांची सोय पशुधनाच्या संख्येप्रमाणे तात्काळ करावी असे स्पष्ट लेखी आदेश संबंधित सर्व विभागांना आपला विशेष अधिकार वापरून तात्काळ द्याव्यात. जिल्ह्यामध्ये खूप भीषण दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. जिल्हाधिकारी यांनी विशेष अधिकाराचा वापर करून तात्काळ पशुधन जगावे याकरिता तात्काळ स्पष्ट लेखी आदेश द्यावेत. पोलीस कारवाईत सोडून आणलेल्या पशुधना बरोबरच अनेक आसपासच्या गावातील शेतकरी बांधव देखील दुष्काळी परिस्थितीमुळे जवळपासच्या गोशाळांमध्ये आपले पशुधन आणून सोडत आहे. सर्व गोशाळा अडचणीच्या परिस्थितीतही पशुधन ठेवून घेत त्याची देखभाल देखील करत आहेत याची नोंद घेऊन तात्काळ मदत करावी.

चारा पाण्याअभावी पशुधन दगावू नये याची खबरदारी घेण्यास टंचाई निवारण कक्षास सूचना द्याव्यात. गोशाळांच्या गंभीर प्रश्नाकडे स्वत: बारकाईने लक्ष घालावे. जिल्हा बाहेर चार न पाठवण्याच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी अशा सूचना संबंधित सर्व विभागांना द्याव्यात. इंजि. यश शहा यांनी सर्व गोशाळांचे कागदपत्रे, रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. ते पूर्ण करून घेतले. अहमदनगर जिल्ह्यासाठी यशच्या वैयक्तिक प्रयत्नातून मुंबईतील समस्त महाजनचे मॅनेजिंग ट्रस्टी गिरीश शहा तसेच आदिजीव युवक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयेश शहा यांना विनंती करून मुंबईत भेटून जिल्ह्यातील जवळपास सर्वच गोशाळांसाठी ७० लाखांचा मोठा निधी कॉर्डिनेटर या नात्याने विशेष प्रयत्नातून मिळवून दिला. हा निधी गोमातांसाठी चारा, पाणी, गोशाळेत शेड, सोलर, कुट्टी मशीन अशा विविध गोशाळातील गरजा याद्वारे पूर्ण केल्या गेल्या. जिल्ह्यातील पांजरपोळ व गोशाळा संचालकांनी शहा यांचे कठीण प्रसंगी केलेल्या मोठ्या मदतीबद्दल धन्यवाद दिले व आभार मानले.