मनपाच्यावतीने मतदान जनजागृती संकल्प रथाचे उद्‌घाटन

0
25

मनसेच्यावतीने आयुक्तांना निवेदन

नगर – महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मागील निवडणुकीमध्ये महापालिका हद्दीमध्ये ६०. २६ टक्के मतदान झाले होते. आता १०० टक्के मतदान करण्यासाठी विविध उपयोजना करण्यात येत असून आज महिला बचत गटाची बैठक झाली असून सदस्यांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. याचबरोबर शहरांमध्ये मतदान जनजागृती साठी संकल्प रथयात्रा सुरू करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी दिली. अहमदनगर महापालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटाच्या बैठकीत आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपायुक्त सपना वसावा, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान, सुप्रिया घोगरे, निलेश शिंदे, नानासाहेब बेलेकर, आदीसह बचत गटातील महिला उपस्थित होत्या. मनपाच्यावतीने लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोरदार तैयारी सुरू असून विविध संघटनेच्या माध्यमातून शहरांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी संकल्प रथयात्रा सुरू केले आहे. याचबरोबर ज्येष्ठ नागरिक व अपंगांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी सोय केली आहे. त्याचबरोबर महिला बचत गटांना लोकशाही दूध ओळखपत्र देण्यात येणार असून त्यांच्यामार्फत घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात येईल. महिला बचत गटातील सदस्यांना १००% मतदान करण्यासाठी शपथ दिली, अशी माहिती उपायुक्त सपना वसावा यांनी दिली.