रस्त्यावरील कचऱ्याचे ढिगारे तातडीने उचला अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करणार

0
20

मनसेच्यावतीने आयुक्तांना निवेदन

नगर – अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील रस्त्यावर व आजुबाजूला खूप मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे ढीग तयार झाले आहेत. ते तातडीने हटविण्यात यावेत, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना देण्यात आले. याप्रसंगी सावेडी विभाग अध्यक्ष किरण रोकडे, भूषण कोठारी, समर्थ मुर्तडकर, वृषभ साबळे, शिवम बांगर आधी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटंले आहे की, प्रभाग क्र.६ उदय अपार्टमेंट, अक्षय अपार्टमेंट, अंबर अपार्टमेंट, कांचनगंगा अपार्टमेंट तसेच न्यूलियस हॉस्पिटल परिसरात घंटागाडी नियमित नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावर साठलेल्या कचर्‍यामुळे रोगराई पसरण्याची शयता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागात घंटागाडी नियमित सुरू करावी व रस्त्यावर साठलेला कचरा साफ करण्यात यावा तसे न झाल्यास शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आवारात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.