उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नगरमध्ये २१ एप्रिलला मोफत कार्यशाळा

0
24

‘जितो युथ विंग’चे आयोजन, सविस्तर मार्गदर्शन आणि प्रवेशासाठी सहकार्य

नगर – उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणार्‍या सर्व समाजातील इच्छुकांसाठी जितो अहमदनगर, जितो युथ विंगच्या पुढाकाराने २१ एप्रिल रोजी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी सकाळी ११ वाजता स्टेशन रोडवरील हॉटेल अर्थ बँक्वेट येथे सदर कार्यशाळा होणार आहे. राईज ग्लोबल स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सीच्या सहकार्याने ही कार्यशाळा होत आहे. यात आंतरराष्ट्रीय करियर कोच क्षमा जैन सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती जितो युथ विंगचे चेअरमन गौतम मुथा यांनी दिली. नगरमधून शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी आहेत. या सर्वांना एकाच व्यासपीठावर परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठे, तिथले चांगले अभ्यासक्रम, प्रवेश अर्ज, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, जेईएपी शिष्यवृत्ती, क्षिक्षण कर्ज योजना, परदेशात गेल्यावर निवास व्यवस्था, तिथे शिक्षणाबरोबरच नोकरीच्या संधी यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल. इच्छुक व पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना जागेवर ऑफर देण्यात येतील. परदेशात चांगले शिक्षणासाठी मार्गदर्शन व संपूर्ण सहकार्य या कार्यशाळेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नगरमधील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी जितोच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जितो अहमदनगरचे चेअरमन जवाहर मुथा, सेक्रेटरी आलोक मुनोत, सीएफई कन्व्हेनर जितो अपेस सुमंगला मुनोत, जितो युथ विंग सेक्रेटरी खुशबू मुनोत, सीएफई कन्व्हेनर रितेश पटवा, सीएई नगर कन्व्हेनर चेतन भंडारी यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क: ८६९८६५२७२७.