गुलमोहर रोडला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नगर – विविध पदाच्या माध्यमातून सर्वसाम ान्यांचे प्रश्न सोडविणारे भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येतात. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. शहरात वर्चुअल आमदार म्हणून नव्हे, तर सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणारा आमदार म्हणून लोकांशी नाळ जुळली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. गुलमोहर रोड, सावेडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, उद्योजक अमोल गाडे, माजी नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, अविनाश घुले, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, युवती सेलच्या अंजली आव्हाड, किरण घुले, युवराज शिंदे, सागर मुर्तुडकर, सुधीर पोटे, परेश पुरोहित, युवराज शिंदे, सागर गुंजाळ, जॉय लोखंडे, साधना बोरुडे, लकी खुबचंदाणी, रवी दिंडी, चेतन लखापती, उद्योजक जनक आहुजा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार जगताप पुढे म्हणाले की, लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी संपर्क कार्यालय देखील महत्त्वाचे आहे.
कोणाचीही मध्यस्थी न ठेवता लोकांशी थेट संपर्क ठेऊन त्यांचे प्रश्न सोडविले जात आहे. राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, आमदार जगताप यांनी मागील पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढला. प्रत्येक प्रभागात व परिसरात विकास कामे झाली आहे. मूलभूत नागरी प्रश्न सोडवून सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम त्यांनी केले. नागरिकांसाठी उद्यान विकसित करुन शहर विकासाला चालना देण्याचे काम केले. त्यांनी नगरला खेड्याची ओळख पुसण्याचे काम केले. तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे पदाच्या माध्यमातून नेतृत्व दिले. सावेडीच्या राष्ट्रवादी युवक कार्यालयातून युवकांचे प्रश्न सोडविले जाणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, वैद्यकीय मदत आणि इतर शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्नशील राहून कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत खोसे यांनी यांनी सावेडी उपनगर परिसरात सर्वच शासकीय कार्यालय आली असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संपर्क कार्यालयाची गरज होती.
राष्ट्रवादी युवकच्या संपर्क कार्यालयाद्वारे या भागातील नागरिकांचे व युवकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. संपत बारस्कर म्हणाले की, आमदार जगताप यांनी शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून विविध प्रश्न सोडवली. वार्डा-वार्डात कोट्यावधी रुपयांची कामे झाल्याने शहाराचे रुप पालटले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी ऋषीकेश जगताप, शिवम कराळे, तन्मितसिंह सरना, आशितोष पानमळकर, कृष्णा शेळके, कृष्णा थेटे, कुनाल ससाणे, ओमकार मिसाळ, ओमकार म्हसे, गौरव हरबा, केतन ढवण, दिपक वाघ, किरण घुले, तन्वीर मन्यार, अरबाज शेख, शुभम चितळकर, मंगेश शिंदे, पंकज शेंडगे, मयुर रोहोकले, दिग्विजय जाधव, समृद्ध दळवी, अभिजीत साठे, कृष्णा कांबळे, अनिकेत खंडागळे, संदीप गवळी, तुषार टाक, मंगेश जोशी, साहिल पवार, दीपक गोरे, डॉ. केतन गोरे, डॉ. सौरभ पंडित, मंगेश शिंदे, अभिजीत खरात, हरीश पंडागळे, शेखर गोंधळे, श्रेयस धाडगे, तुषार भांबरे, अमोल कांडेकर, दिग्विजय जाधव, सुरज गवारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण घुले यांनी केले. आभार शिवम कराळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवकच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.