शोरूमसमोरून मोटारसायकल चोरणारा पोलिसांकडून गजाआड

0
27

नगर – नगर मनमाड रोडवरील गजराजनगर फाटा येथील टाटा शोरुम समोरून मोटारसायकलची चोरी करणार्‍या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून चोरीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल हस्तगत केली आहे. मधुकर बाबासाहेब ससे (रा. झापवाडी ता. नेवासा) असे या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी सागर सुरेश पाटोळे (रा. जेऊर बायजाबाई ता.नगर) यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल (क्र. एम एच १६ बी डी १८६१) अज्ञात चोरट्याने दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० या कालावधीत गजराजनगर फाटा येथील टाटा शोरुम समोरून चोरुन नेली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना स.पो. नि. माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी मधुकर बाबासाहेब ससे याने केला आहे. त्यानुसार स.पो.नि. चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथकाला कारवाई साठी पाठविले. या पथकाने आरोपीला शिताफीने पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेली मोटारसायकल काढून दिली. सदरची कारवाई स.पो.नि. माणिक चौधरी यांचे मार्गदर्शानाखाली पो.हे.कॉ. नंदकिशोर सांगळे, राजु सुद्रिक, पो.ना.विष्णु भागवत, पो.कॉ.किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, मोबाईल सेल चे राहुल गुंडु यांनी केली आहे.