‘इव्हिनिंग वॉक’ करणाऱ्यो महिलेचे मंगळसुत्र लांबवले

0
33

मार्केटयार्ड मागील कॉलनीतील घटना; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल 

नगर – सायंकाळी वॉकींगला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने बळजबरीने हिसका मारून तोडून नेल्याची घटना मार्केटयार्ड मागील चैतन्य कॉलनीत घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्ज्वला संपतलाल कटारिया (वय ६५, रा. चैतन्य कॉलनी, मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी कटारिया या रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास चैतन्य कॉलनीत रस्त्याने वॉकींग करत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र ओरबाडले. त्यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना चोरट्याने जोरदार धक्का दिल्याने त्या रस्त्यावर पडून जखमी झाल्या. त्यानंतर तो चोरटा मार्केट यार्ड च्या दिशेने पसार झाला. फिर्यादी कटारिया यांचा आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. याबाबत कटारिया यांनी मंगळवारी (दि.१६) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं. वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.