नगरमधील कत्तलखान्यावर कारवाई करत गोमांस, जिवंत जनावरांसह २५ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

0
20

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची झेंडीगेट परिसरातील मोठी कारवाई

नगर – महाराष्ट्र राज्यात गोवंशीय जनावरांच्या कत्तलीस बंदी असतानाही नगरमधील कत्तल खान्यात मोठ्या प्रमाणात या जनावरांची कत्तल केली जात असल्याचे पुन्हा समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील झेंडीगेट परिसरात असलेल्या कत्तलखान्यावर बुधवारी (दि.१७) पहाटे टाकलेल्या छाप्यात गोमांस, जिवंत जनावरे व कत्तलीसाठीची साधने असा २५ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव व अंमलदार भाऊसाहेब काळे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, सचिन अडबल, संतोष लोढे, संतोष खैरे, रविंद्र घुगांसे, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे यांना नगर शहर परिसरात गस्त घालून गोमांस वाहतुक व विक्री करणारे इसमांची माहिती घेवुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. सदर पथक याबाबत माहिती घेत असताना शोएब कुरेशी, फैजान कुरेशी, सुफियान कुरेशी (सर्व रा.व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) हे सरकारी शौचालया जवळ, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट या ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस टेम्पोमध्ये भरत आहेत व गोवंशीय जातीची काही जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयतेने जवळच असलेल्या शेडमध्ये डांबुन ठेवलेली आहेत.

अशी माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच नमुद ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम १ टेम्पोमध्ये गोमांस भरताना दिसले व एका पांढरे रंगाचे पिकअप गाडीमध्ये जनावरे असल्याचे दिसले. पथकाने अचानक छापा घालुन काही इसमांना जागीच पकडले, त्यांनी त्यांची नावे शोएब रौफ कुरेशी (वय २८), फैसल अस्लम शेख (वय १९), अदनान फिरोज कुरेशी (वय २०), मुसाविर इन्नुस कुरेशी (वय २३), ओवेस रशिद शेख (वय २४) व अल्तमश अस्लम कुरेशी (वय २२, सर्व रा. सरकारी शौचालया जवळ, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर) असे सांगितले. सदर ठिकाणी असलेल्या शेडची पाहणी करता त्यामध्ये जिवंत गोवंशीय जनावरे विना चारा पाण्याचे निर्दयतेने डांबुन ठेवल्याचे दिसुन आल्याने ताब्यातील इसमांना जनावरे व कत्तल केलेल्या गोमांस बाबत विचारपुस करता त्या इसमांनी फैजान इद्रिस कुरेशी (फरार) व सुफियान ऊर्फ कल्लु इद्रिंस कुरेशी (फरार) यांनी जिवंत जनावरे खरेदी करुन ते कत्तल करण्यासाठी आणल्याचे सांगितले. पकडलेल्या ६ आरोपींच्या ताब्यातून ७ लाख ९८ हजार रुपये किंमतीचे २ हजार ६६० किलो गोमांस, ७ लाख ७० हजार रुपये किंमतीची ११ मोठी जिवंत जनावरे, ६ लाख रुपये किंमतीचा १ महिंद्रा पिकअप, ४ लाख रुपये किंमतीचा १ अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व ४०० रुपये किंमतीचे लोखंडी सुरी व सत्तुर असा एकुण २५ लाख ६८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात भा.दं. वि. कलम २६९, ४२९, ३४ सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम ५ (अ), (ब), (क), ९ व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.