डाटा चोरून बँक क्रेडीट कार्डद्वारे १ लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
28

नगर – भिंगार परिसरात लष्करी वसाहतीत राहणार्‍या एका लष्करी जवानाच्या क्रेडीट कार्डचा डाटा चोरून त्या द्वारे सुमारे १ लाख रुपयांची खरेदी करत ऑनलाईन आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सोमवारी (दि.१५) दुपारी भिंगार कम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाय. जे. यक्षित (मूळ रा. पुरूमलापल्ली, आंध्रप्रदेश, हल्ली रा. एम आय सी अँड एस, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी एसबीआय बँकेचे क्रेडीट कार्ड घेतलेले होते. मात्र त्यावरून काहीही खरेदी केली नाही, किंवा कोणालाही ओटीपी सांगितलेला नाही तरीही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या क्रेडीट कार्डचा डाटा चोरून त्या द्वारे सुमारे १ लाख रुपयांची खरेदी करत ऑनलाईन आर्थिक फसवणुक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं. वि. कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.