रामनवमी मिरवणुकीवर ड्रोनसह ‘सीसीटीव्ही’ ची नजर

0
23

दि.१७) नगर शहरातून काढण्यात येणार्‍या मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून या मिरवणुकीवर ड्रोनसह सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. मिरवणुकीसाठी ३५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने शहरातून निघणार्‍या सर्वच मिरवणुकांवर पोलिस प्रशासनाच्यावतीने बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. रामनवमीनिमित्त बुधवारी नगर शहरातून मिरवणूक काढण्यासाठी सकल हिंदू समाज, हिंदूराष्ट्र सेना व सावेडी येथील मंडळाने पोलिसांकडे परवानगी मागितलेली आहे.

३५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात; पोलिस अधिक्षकांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी 

ही मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी मिरवणुकीवर ड्रोनसह सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. मिरवणुकीसाठी ३५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मंगळवारी (दि.१६) दुपारी मिरवणूक मार्गावरील सर्वच प्रमुख चौकातील बारकाईने माहिती घेऊन अधिकार्‍यांना सूचना केल्या. शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणीही केली. यावेळी त्यांच्या समवेत अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सह कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.