शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही घसरण; गुंतवणूकदार धास्तावले

0
25

मुंबई – भारतीय शेअर बाजारात सलग दुसर्‍या दिवशीही मंगळवारी (दि.१६) कमजोरीचा कल कायम असून आजही बाजाराच्या दोन्ही निर्देशांकाची ओपनिंग घसरणीच्या लाल रंगात झाली. शेअर बाजारातील व्यवहार मंगळवारी कमजोर नोटवर सुरू झाले. व्यापाराच्या सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेस ४९३ अंक घसरला आणि ७२,९०६ अंकांवर ट्रेंड सुरू केले तर निफ्टीने १३७ अंक कमजोर होऊन २२,१३५ अंकांवर ट्रेडिंग सुरू केले. बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात घसरले. बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, टायटन, सिप्ला, आयशर मोटर्स, डॉ. रेड्डीज आणि डिव्हीज लॅबच्या शेअर्सनी नफा नोंदवला तर एलटीआय माइंडट्री, टीसीएस, इन्फोसिस, कोटक बँक, बजाज फायनान्स, एनटीपीसी आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. सोमवारी बाजारात मोठी पडझड झाली तर मंगळवारी पुन्हा एकदा शेअर बाजारात कमजोरी दिसून येत आहे. तसेच बाजाराचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच निफ्टी ऑटो आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात किंचित तेजी नोंदवली जात असून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणार्‍या कंपन्यांबद्दल बोलायचे तर, मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात जछॠउ शेअर तेजीत धावत होता, तर भारत इलेट्रॉनिस, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, विप्रो, एचडीएफसी, एचसीएल टेक, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक आणि इन्फोसिस लिमिटेड शेअर्समध्ये पडझड नोंदवली गेली.