सोन्याचा नवा उच्चांक, ७३,५१४ रुपये तोळा

0
25

नवी दिल्ली – सोन्याने आज म्हणजेच १६ एप्रिल रोजी नवा
सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स
असोसिएशन च्या वेबसाइटनुसार १० ग्रॅम सोने ७०१ रुपयांनी महागून
७३,५१४ रुपये झाले. १६ दिवसांत सोन्याचे भाव ४,५५० रुपयांनी वाढले
आहेत. चांदीमध्येही आज वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव १८०
रुपयांनी वाढून ८३,६३२ रुपये झाला आहे. यापूर्वी १२ एप्रिल रोजी चांदीने
८३,८१९ रुपयांचा उच्चांक गाठला होता.
इस्रायल-इराणमध्ये १ एप्रिलपासून तणाव सुरू झाला. तेव्हा
सोन्याचा भाव ६८,९६४ होता. आता १६ एप्रिल रोजी त्याची किंमत
७३,५१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.