सांस्कृतिक वारसा व मूल्ये जपण्याचे काम रसिक ग्रुप करत आहे : विशेष पोलीस महासंचालक बी जी शेखर पाटील

0
28

विशेष पोलीस महासंचालक बी.जी.शेखर पाटील यांचे प्रतिपादन, रसिक ग्रुपच्या रसिक गौरव पुरस्कारांचे वितरण

नगर – नगर शहराची वाटचाल सांस्कृतिक शहराकडे होत आहे. यामध्ये रसिक ग्रुपचे मोलाचे योगदान आहे. नागरिकांमध्ये आत्मकेंद्रित स्वभाव वाढत असल्याने इतरांचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रमाण कमीत होत आहे. अशा परिस्थितीत ग्रुपने विविध क्षेत्रातिल व्याक्तीमात्वांचा गौरव करत पुरस्कार देवून त्यांच्या कामाचे कौतुक करण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. या माध्यमातून सांस्कृतिक वारसा व मुल्ये जपण्याचे काम ग्रुप करत आहे, असे गौरवोद्गार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी केले. नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात सामजिक जाणीवेतून महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तीमत्वांना तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला अशा क्षेत्रात भरीव योगदान देत नगर शहराच्या जडणघडणीत, विकासात व नावलौकिकात मोलाची भर घालणार्‍या व्यक्तींना ‘रसिक गौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. यावर्षीचे पुरस्कार नुकतेच डॉ.बी.जी.शेखर पाटील, मनापा आयुक्त डॉ.पंकज जावळे व खा.सुजय विखे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, सी.जी पॉवर कंपनीचे उपाध्यक्ष इंद्रनील धनेश्वर, सुभाष कायगावकर, श्रीमती छाया फिरोदिया, अशा फिरोदिया, राजेश भंडारी, श्रीमती नीता गांधी, सतीश बोथरा, के.के.शेट्टी, शशीकांत गुळवे, सौ.मंजू मुनोत, पियुष मुनोत, डॉ.गोपाल बहुरूपी, श्रीकृष्ण जोशी, यशवंत शिंदे, प्रा.तुषार आंबाडे, रमेश फिरोदिया, अमित बुरा, विजय गडाख, रामदास खांदवे, मकरंद कुलकर्णी, डॉ.प्रकाश कांकरिया, श्रीहरी टिपूगडे, विजय इंगळे, गौतम मुनोत आदी उपस्थित होते. यावेळी गायक अवधूत गुप्ते यांनी सामाजिक जाणीवेतून संगीत क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना रसिक कलागौरव पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात आला. तसेच तरुणाई पुरस्काराने युवा बॅडमिंटनपटू यश शहा याला सन्मानित करण्यात आले. यावेळी रसिक गौरव पुरस्कारही देण्यात आले.

यामध्ये नगरच्या नेत्रतज्ञ डॉ.सुधा कांकरिया यांचे जगातील सर्वात मोठ्या नोबेल पीस अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन झाल्याबद्दल, नगरची नवोदित युवा गायिका अपूर्वा भुसे ही यशस्वी गायिका होत अल्पकाळातच पूर्ण राज्यात मोठी प्रसिद्धी मिळवल्याबद्दल, सर्वसमान्य कुटुंबातून वर येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी ग्राफिक डिझायनर झालेले किरण गवते, छोट्या मोठ्या कार्यक्रमात उत्कृष्ट संगीतसाथ देत रंगत आणणारे वादक अजय साळवे व उत्कृष्ट वादक अजित गुंदेचा या दोघांना संगीत क्षेत्रातील बहुमोल योगदाना बद्दल, आयपीएलच्या धर्तीवर नागपूर येथे झालेल्या एमपीएलच्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या टीमचा कर्णधार व रणजीपटू अझीम काझी, कबड्डी खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन करणारे क्रीडा संघटक विजयसिंह मिस्कीन व केंद्र सरकारचा राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार मिळवलेले उद्योजक श्रीजी इंजिनीअरिंगचे दिनेशकुमार अग्रवाल व टेनोटॅक अरुण कुलकर्णी आदींना पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. जयंत येलूलकर म्हणाले, आपले नगर शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जावे यासाठी गेल्या २३ वर्षांपासून रसिक ग्रुप सांस्कृतिक वारसा जपत काम करत आहे. या कामात अनेकांची साथ मिळत आहे. नगरमध्ये अनेक हिरे आहेत जे आपल्या कार्यकर्तृत्ववाने नगरचे नावलौकिक वाढवत आहेत. अशांचा गौरव करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी गौरव पुरस्कार देत आहोत.