खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेट खेळाचे मार्गदर्शन काळाची गरज : माजी महापौर बाबासाहेब वाकळे

0
34

सावेडीतील कराळे क्लब हाऊस येथे एस. के क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने समर कॅम्प शिबिराचे उद्‌घाटन

नगर – विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धेमध्ये देखील करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धेचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी हा मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे त्यामुळे मैदानी खेळाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी मैदानी खेळाकडे वळावे, खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेट खेळाचे मार्गदर्शन काळाची गरज बनली आहे, एस के क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप आडोळे हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरांमध्ये चांगले क्रिकेटर निर्माण होत आहे अकॅडमीचे खेळाडू विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजेतेपद मिळवत आपल्या शहराचे नावलौकिक करत आहे असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. सावेडीतील कराळे लब हाऊस येथे एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीने समर कॅम्प शिबिराचे उद्घाटन बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झाले. यावेळी एस के अ‍ॅकॅडमीचे प्रशिक्षक संदीप आडोळे, डॉ.हर्षवर्धन तन्वर, रवी वाकळे, करण कराळे, अजय कविटकर, मेजर संदीप घोडके, किशोर वाकळे, मनोज आडोळे, अभिषेक तांबे, अभिजीत मस्के, सार्थक ख्रिस्ती आदींसह खेळाडू पालक वर्ग उपस्थित होते डॉ. हर्षवर्धन तन्वर म्हणाले की क्रिकेट हा खेळ स्पर्धेचा खेळ असून त्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत करावी लागते या खेळामध्ये सातत्य, संयम बाळगावा लागतो.

एस के क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण होत आहे, पुणे येथील अ‍ॅकॅडमीशी आपण स्पर्धा करत असून आपले खेळाडू क्रिकेट खेळाचे चांगले प्रदर्शन करत आहे. नक्कीच या माध्यमातून आयपीएल सारख्या स्पर्धेमध्ये नगरचे खेळाडू खेळले जातील, क्रिकेट हा खेळ म्हणून पाहू नका तो आपल्याला जीवन जगण्याचे शिकवत असतो, एस के क्रिकेट अकॅडमी चे प्रशिक्षक संदीप आडोळे हे स्वतः क्रिकेटर असून त्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन खेळाचे चांगले प्रदर्शन केले आहे त्यामुळे ते नक्कीच चांगला क्रिकेटर घडवण्याचे काम करत आहे असे ते म्हणाले प्रशिक्षक संदीप आडोळे म्हणाले की शहरातील खेळाडू व विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट खेळाचे अचूक मार्गदर्शन मिळावे यासाठी समर कॅम्प शिबिराचे आयोजन केले आहे क्रिकेट खेळाची प्राथमिक माहिती या शिबिरातून मिळेल तसेच खेळाडूंना टर्फ विकेटवर खेळण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाईल तरी जास्तीत जास्त खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अजय कविटकर, रवी वाकळे, करण कराळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.