संविधानामुळे देशाच्या विकासाला गती : आयुक्त डॉ. पंकज जावळे

0
50

नगर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना तयार करून जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही निर्माण केली. त्यामुळे समाजात एकोपा, प्रेम, सद्भावना निर्माण झाले आहे, प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाला असून सविंधानामुळे देशाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे, नगर शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार होत असून या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होईल असे प्रतिपादन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन

मनपाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, प्रांताधिकारी सुधीर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, तहसीलदार संजय शिंदे, अशोक गायकवाड, अस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, जालिंदर बोरुडे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.