पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांची माहिती

0
27

नगर – हद्दपार असतानाही नगर शहरात वास्तव्य करणार्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माणिक चौकात पकडले. अरबाज शकील सय्यद (वय २५, रा. हाजी ईब्रहिम बिल्डींग, स्टेट इंपरिअल चौक, नगर) असे पकडलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस अंमलदार विशाल दळवी यांच्या फिर्यादीवरून सय्यद विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार अरबाज शकील सय्यद याला उपविभागीय दंडाधिकारी नगर यांनी नगरमधून हद्दपार केले आहे. तो हद्दपार आदेशाचा भंग करून नगर शहरात वास्तव्य करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सय्यद याला माणिक चौकातून ताब्यात घेत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.