‘अहमदनगर एमआयडीसी’मधील प्लॉटचे बेकायदेशीरपणे औद्योगिकमधून वाणिज्य भूखंडात हस्तांतरण तत्काळ थांबवावे

0
57

आदर्श जनरल कामगार संघटनेचे नाशिक औद्यागिक विकास महामंडळास निवेदन

नगर – अहमदनगर एमआयडीसी मधील जुनी सह्याद्री कंपनी सह्याद्री चौक भूखंड क्रमांक ए-१ चे बेकायदेशीररित्या औद्योगिक भूखंडातून वाणिज्य भूखंडामध्ये हस्तांतरण करूत अर्थांजनाच्या उद्देशाने छोटीय्छोटी प्लॉटिंग करून उच्च रेटमध्ये विक्री केले जात आहेत. कार्याला स्थगिती मिळावी म्हणून आदर्श जनरल कामगार संघटनचे अध्यक्ष प्रवीण सप्रे यांनी सदर भूखंडाबाबत उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद खंडपीठ) येथे जनहित याचिका क्रमांक ३४१८ /२०२२ ही दाखल केलेली असून, जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही. तोपर्यंत सदर कार्याची पूर्णतः स्थगिती मिळावी, अशा आशयाचे निवेदन प्रादेशिक अधिकारी औद्योगिक विकास महामंडळ नाशिक येथे देण्यात आले आहे. या कार्यासाठी जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे व श्री साई सामाजिक प्रतिष्ठान नवनागापूरचे अध्यक्ष आकाश कोल्हाळ यांनी समर्थन जाहीर केले आहे.

औद्योगिक महामंडळाने शेतकर्‍यांकडून शेती विकत घेताना या जागेवरती फक्त औद्योगिक कंपनी स्थापन केली जाईल, या उद्देशाने घेतले होते पण त्यांचा उद्देश बाजूला ठेवून हे विशिष्ट समाजाच्या लोकांनी एम आयडीसीतील वरिष्ठ अधिकार्‍यांशी हातमिळवणी करून अर्थाजनासाठी तेथे प्लॉटिंगचे कार्य सुरू केलेले आहे. औद्योगिक विकासाच्या नावाने येथील शेतजमीन शेतकर्‍यांकडून अत्यंत अल्प दरात विकत घेतली गेली होती. त्याचा स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना कसलाही फायदा झालेला नाही. यामुळे अनेक दिवस बंद असलेले सह्याद्री कंपनीची जागा परत आज स्थितीतील चालू मूल्यांकनाच्या आधारावर त्याच शेतकर्‍यांना परत मिळावी किंवा येथे राज्यातून मोठे औद्योगिक व्यवसाय परत सुरू करण्यात यावे किंवा या असंविधानिक कार्याला स्थगिती मिळावी. सदर निवेदनाची संबंधित अधिकार्‍यांनी कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यास आदर्श कामगार संघटना उग्र स्वरूपाचे अनिश्चितकालीन जनआंदोलन आझाद मैदान, मुंबई येथे अल्प वेळेत सूचना देऊन केले जाईल, असेही म्हटले आहे.