तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नवीन मतदारांना फोनवरून अरेरावी

0
23

नगर – मागील काही महिन्यापासून निवडणूक विभाग तहसील कार्यालय अहमदनगर येथून अहमदनगर शहरांमधील नवीन मतदान नोंदणी करणार्‍या स्थलांतरित मतदारांना फोनवर धमकी देऊन तुमच्यावर पोलीस कारवाई करू तुम्ही पैशासाठी मतदान कार्ड काढता व अन्य प्रकारचे गलिच्छ शब्द वापरून मानसिक त्रास देऊन धमकवण्यात येत आहे. हा प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून व नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवणारा आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना रविंद्र वाबळे यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मतदारांना फोन करून दम देणारी व्यक्ती निवडणूक विभागामध्ये आहेत. त्यांचा तपास करून योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी. निवडणूक विभाग कार्यालय येथून नोंदणी करणार्‍या अहमदनगर शहरांमधील कोणत्याही नागरिकाला धमकी व पोलीस कारवाई करू, पैशासाठी मतदान नोंदविता आहे असा फोन केला तर आम्ही कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता तहसील कार्यालय निवडणूक शाखा येथे आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.