सावेडी उपनगरातील भंगार दुकानाला लावली आग; दुचाकीवर आलेल्या अनोळखी इसमावर गुन्हा दाखल

0
45

नगर – सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावर असलेल्या डी-मार्टसमोरील रिध्दीसिध्दी नावाच्या भंगार दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावली. सोमवारी (दि.८) पहाटे दोन वाजता ही घटना घडली. दुकानाचे मालक रावसाहेब धोंडीबा सोनवणे (वय ३८, रा. पवननगर, भिस्तबाग, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दुचाकीवरील (क्र. एमएच १६ बीएफ २५९८) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे यांचे डी-मार्टसमोर रिध्दीसिध्दी नावाचे भंगारचे दुकान आहे. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीने सोनवणे यांच्या भंगारच्या साहित्य खरेदी विक्रीच्या दुकानास ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने पेटवून दिले. तसेच सकाळी नऊ वाजता सोनवणे यांना त्या व्यक्तीने शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार गांगुर्डे अधिक तपास करत आहेत.