सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने एका जणावर गुन्हा दाखल

0
81

नगर – सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरूणाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहिद शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. तक्ती दरवाजा, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी यश शैलेंद्र दुबे (वय १९,रा. बागरोजा हाडको, दिल्ली गेट, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. शाहिद शेख याने त्याच्या सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून वादग्रस्त मजकूर व्हायरल केला. तसेच स्टेटसला ठेवून दोन समाजात शत्रुत्व, व्देषाची भावना किंवा तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. या मजकूरामुळे तक्रारदार यांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे सदर आक्षेपार्ह स्टोरी टाकणार्या शाहिद शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कैलास कपीले अधिक तपास करीत आहेत.