अहमदनगर कापड व्यापारी महासंघ अध्यक्षपदी शामसुंदर सारडा; उपाध्यक्षपदी सचिन चोपडा व राजेंद्र गांधी, सेक्रेटरीपदी मुकेश अरोरा

0
19

नगर – अहमदनगर कापड व्यापारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पांजरापोळ गोरक्षण संस्थेत नुकतीच पार पडली. या बैठकीत संघाच्या अध्यक्षपदी शामसुंदर सारडा यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सचिन चोपडा व राजेंद्र गांधी यांची तर सेक्रेटरीपदी मुकेश अरोरा यांची निवड करण्यात आली आहे. शामसुंदर सारडा म्हणाले, नगरचा कापड व्यापार महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. कापड व्यापार्‍यांचे अनेक प्रश्न असून ते सोडविण्यासाठी व्यापारी संघ सातत्याने प्रयत्न करीत आहे. जाचक कर प्रणाली तसेच अन्य प्रश्नांवर सर्वांना सोबत घेवून संघ भविष्यातही कार्यरत राहिल. एकजूट व संघटन महत्वाचे असून या बळावर अडचणी सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी राजेंद्र गांधी, सचिन चोपडा, रजनीकांत गांधी यांनीही भाषण केले. कापड व्यापारी संघ सर्व सदस्यांसाठी करीत असलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला. सभासदांनीही मनोगत व्यक्त करीत महासंघामुळे सर्व व्यापार्‍यांना हक्काचे व्यासपीठ मिळालेले असून संघटनेचे कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे चालू असल्याने समाधान व्यक्त केले. अहमदनगर कापड व्यापारी संघाच्या खजिनदारपदी धीरज मुनोत, सहसेक्रेटरीपदी विजय गांधी, कार्यकारिणी सदस्यपदी रजनीकांत गांधी, रसिक चोपडा, सचिन कटारिया, सचिन पेटकर, प्रशांत बोरा, अजय गांधी, विजय मुनोत, संतोष ठाकूर, कपिल शहा, विशाल शेटिया, निमंत्रित सदस्यपदी अभय कोठारी, निलेश संचेती, स्वप्नील डुंगरवाल यांची निवड झाली आहे. या बैठकीस सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वांनी पांजरापोळ गोरक्षण संस्थेतील हुरडा पार्टी व जेवणाचा आस्वाद घेतला.