गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगरमध्ये निलेश लंके यांच्या प्रचाराचा प्रारंभ

0
29

नगर – शहर महाविकास आघाडीची बैठक होऊन ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचे उमेदवार आ.निलेश लंके यांच्या प्रचारचा शुभांरभ सकाळी ९ वा.शिवालय,चितळे रोड ऑफिस येथे गुढी उभारून करण्यात येणार आहे अशी माहिती आघाडी कडून देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर व अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार) संभाजी कदम, काँग्रेसचे किरण काळे, गिरीष जाधव, आदी उपस्थित होते माजी मंत्री अनिल राठोड यांच्या संपूर्ण संरक्षण, संपूर्ण सुविधा व निरंतर समाजसेवा हा मुद्दा घेऊन ९ तारखेपासून आम्ही प्रत्येक नगरकरांना भेटणार आहोत. सध्या नगरमधील जे दहशतीचे वातावरण, ताबेमारी, युवकांना रोजगार मिळत नाही हे जनतेला सांगणार आहोत. विजयाची गुढी उभारून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे युवा नेते विक्रम राठोड यांनी सांगितले नवे वर्ष, नवी सुरुवात नव्या यशाची नवी रुजवात… याप्रमाणे करण्यात येणार आहे. तरी महाविकास आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.