महावीर जयंती मिरवणुकीसंदर्भात १० एप्रिलला जैन समाजाची बैठक

0
29

नगर – जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती (जन्मकल्याणक) २१ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्त नगर शहरात विविध कार्यक्रम तसेच भगवान महावीर जयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रम व शिस्तबध्द मिरवणुकीच्या नियोजनासाठी सकल जैन समाजाची बैठक १० एप्रिल रोजी धार्मिक परीक्षा बोर्ड येथे सकाळी १० वाजता प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी म.सा. यांच्या निश्रामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सकल जैन समाज बंधूंनी व मंडळांनी उपस्थित राहून मार्गदर्शन व सूचना करावी, असे आवाहन जैन मंदिरचे अध्यक्ष सुभाषलाल मुथा (सराफ) यांनी केले आहे.