अभ्यासिकेने सर्वसामान्यांच्या मुलांचे भवितव्य घडविले : बाळकृष्ण गोटीपामुल

0
37

श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या अभ्यासिकेतून अधिकारी झालेल्यांचा गौरव, पतसंस्थेच्या संचालक मंडळासह सभासदांचे रक्तदान 

नगर – श्रीमंत कुटुंबातील मुलांना विशेष स्टडी रुम असते. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अभ्यासासाठी घरात कोणतीही व्यवस्था नसते. अशा कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेने उभारलेल्या अभ्यासिकेने अनेकांचे भवितव्य घडत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या कष्टाने आपले ध्येय गाठले असून, अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. जीवनातील मोह सोडून सोन्यासारखं निख्खळ यश प्राप्त केले आहे. अहोरात्र कष्ट केल्याने त्याचे फळ निश्चित मिळत असल्याचे प्रा. बाळकृष्ण गोटीपामुल यांनी सांगितले. शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने श्री मार्कंडेय अभ्यासिका व ग्रंथालयात अभ्यास करुन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध ठिकाणी अधिकारीपदी नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तर पतसंस्थेचा ३३ वा वर्धापनादिनानिमित्त रक्तदान करण्यात आले. दिल्लीगेट येथील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बाळकृष्ण गोटीपामुल, मनोज दुलम, अ‍ॅड. गणेश पाटील, गणेश विद्ये, अ‍ॅड.सागर सोनवणे, अ‍ॅड.रमेश जोशी, अ‍ॅड.राजेंद्र गाली, अजय म्याना उपस्थित होते.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन नारायण कोडम, व्हाईस चेअरमन सविता कोटा, संस्थापक संचालक बालराज सामल, संचालक उमेश इराबत्तीन, दत्तात्रय अंदे, संजय चिप्पा, अशोक शेराल, गणेश वेदपाठक, गौतम भिंगारदिवे, विनायक मच्चा, प्रमिला बिंगी, स्विकृत संचालक देवीदास गुडा, व्यवस्थापक आशिष बोगा आदी उपस्थित होते प्रमूख पाहुण्याचे स्वागत व संस्थेची माहिती सर्वांसमोर मांडली. पतसंस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यश मिळवण्यासाठी अभ्यासिकेमुळे मोठा फायदा व सहकार्य मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर यावेळी युवकांसह संचालक मंडळ व सभासदांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदानाला अष्टविनायक ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक संचालक बालराज सामल (सर) यांनी समाजाला आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाबरोबर शिक्षणातून समाज घडविण्याचे कार्य अभ्यासिकेच्या माध्यमातून सुरु असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी केले. यावेळी धनंजय येनगुपटला, रमेश येमुल, लक्ष्मण वंगा, लक्ष्मण बुरा, राजू गुर्रप, गणेश गुर्रप, चंद्रकांत चित्राल, संदीप छिंदम, विलास छिंदम, ज्ञानेश्वर तिरमल आदी उपस्थित होते.