नदीतील खड्‌ड्यात पडून तरुणाचा मृत्यू

0
32

नगर – श्रीगोंदा तालुयातून जाणार्‍या भीमा नदीच्या पात्रात असलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दिपक उर्फ दुष्यंत बाळासाहेब एकशिंगे (वय ३३, रा. अजनुज, ता.श्रीगोंदा) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत दिपक हा गुरुवारी (दि.४) रात्री वीज पंप चालू करण्यासाठी घरून मोटारसायकल वर भीमानदी पात्राकडे गेला होता. तेथून नदी पात्रालगतच्या भरावावरून परतत असताना त्याचा तोल गेल्याने तो नदी पात्रात असलेल्या खोल खड्ड्यात पडला. त्याची मोटारसायकल मात्र भरावावरच राहिली. ही बाब शुक्रवारी (दि.५) सकाळी काहींच्या निदर्शनास आली. त्यामुळे परिसरातील नागरिक व त्याच्या कुटुंबीयांनी त्याला खड्ड्यातून वर काढून उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉटरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दिपक याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ भाऊ, १ बहिण असा परिवार आहे.