महावीर स्वामी जन्म कल्याणकनिमित्ताने २१ एप्रिलला नगर जिल्ह्यातील कत्तलखाने व मांस विक्री बंद राहणार

0
63

नगर – भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक २१ एप्रिल रोजी संपुर्ण भारतात साजरी केला जाणार आहे. भगवान महावीर स्वामींनी जगाला अहिंसा, जगा आणि जगु द्या हा संदेश दिला. भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने महाराष्ट्र शासन निर्णय, तथा नीमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे पत्र ईमेल द्वारे नीमल वेलफेअर बोर्डाचे कअथठ सदस्य, अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ अल्पसंख्याक समिती उपप्रमुख, तथा समस्त महाजन व आदी जीन युवक ट्रस्ट कॉर्डिनेटर इंजिनिअर यश प्रमोद शहा यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवले होते. त्यानुसार २१ एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे. या आदेशाची कडक अंबलबजावणी करण्याबाबतचे संबंधित सर्व प्रशासन विभागाला पत्रक देखील जिल्हाप्रशासनाने जारी केले आहे. महापालिका प्रशासनास देखील याबाबतचे ईमेल पाठवून महापालिका क्षेत्रात तसेच जिल्हा परिषदेस देखील अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यपाल, महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे यश शहा यांनी नीमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे या संदर्भातील पत्र पाठवुन या पत्राची अंबलबजावणी करण्याबाबत सर्व जिल्हा प्रशासनास व संबंधित सर्व विभागाला शासन पत्रक जारी करावे अशी विनंती केली आहे.