पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन : अविनाश घुले

0
15

नगर – पाणी प्रश्न सुरळीत न झाल्यास मनपामध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी दिला आहे. प्रभाग ११ मधील झेंडीगेट, हातमपुरा, धरती चौक, सथ्था कॉलनी, नवजीवन कॉलनी आदी ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुर्‍या स्वरुपात होत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. त्यातच विद्युत वीज पुरवठा अचानक खंडित केला जात असल्याने ऐन पाणी येण्याच्यावेळी लाईट नसल्याने नागरिकांना इमारतीवरील टाया भरण्यास अडचण होते. अपार्टमेंटमधील नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज वितरण कंपनीच्यावतीने वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. या भागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास परिसरातील नागरिकांसह महानगरपालिकेच्या आवारात तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.