उघड्या नालीतून वाहणाऱ्या मलयुक्त घाण पाण्याची डिएसपी चौकात दुर्गंधी

0
49
oplus_32

नगर – संभाजीनगर रस्त्यावरील जिल्हा पोलिस अधीक्षक चौकात (डीएसपी चौक) सिग्नलवर वाहनधारक उभे असतात. या सिग्नलजवळच जिल्हा पोलिस अधीक्षक फलकाच्या बाजूला असलेल्या उघड्या पावसाळी नालीत सकाळच्या वेळेत मलयुक्त घाण पाणी सोडले जात असून, सदर पाणी पुढे जुन्या आरटीओच्या जलकुंभा समोरील ओढ्यात जात आहे. यामुळे सिग्नलवर उभे असणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सदर मलयुक्त पाणी फकीरवाडा भागातील काही नागरी वस्ती, हॉटेल्स तसेच या भागात असणारे सरकारी व निमसरकारी कार्यालये तसेच भिंगार कॅन्टोन्मेंट भागातील काही सरकारी वसाहती यांचे आहे. नगर-संभाजीनगर, पुणे रोडवर नगर महापालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाची पावसाळी व मनपाची भुयारी गटार योजना अर्धवट अवस्थेत असून, यामुळे महामार्गावर पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असते. सदर मार्गावरील पावसाळी व भुयारी गटारीचे काम मनपा, सार्वजनिक बांधकाम, भिंगार कॅन्टोन्मेंट यांनी पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.