महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे जीआयएस प्रणालीद्वारे होणार पुर्नमूल्यांकन

0
36

नगर – महानगरपालिका हद्दीतील सर्व जमीन व इमारती यांचे सर्व्हेक्षण करून आवश्यक माहिती संकलीत करणे, मुल्यांकन व आवश्यक तांत्रीक सेवा, संगणकीकरण करणे करीता विविध आज्ञावली विकसीत करून पुरविणे, तांत्रीक पुरवठा व इतर अनुषंगिक कामे करणे बाबत निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार महानगरपालिका स्तरावर विविध प्रक्रिया राबवुन कामाचे कार्यादेश देण्यात आलेले असुन अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व जमिनी / मालमत्तांचे सर्व्हेक्षण होणार आहे. मालमत्तेची डिजीटल छायाचित्रे, जिओ टॅगींग तसेच अंतर्गत- बाह्य मोजमापांसाठी आणि त्यांचे कारपेट / बिल्डअप क्षेत्र डिजीटल उपकरण मोजमापणाद्वारे मोजमाप करण्यात येणार आहे. सदर काम हे मे.सी.ई. इंन्फो सिस्टीम लि. नवी दिल्ली या कंपनीस देण्यात आलेले आहे.

महानगरपालिका हद्दीतील मालम त्ता धारकांनी मालमत्ता सर्व्हेक्षणासाठी येणार्‍या कर्मचार्‍यांची ओळख तपासुन त्यांना मालमत्ता कर सर्व्हेक्षणासाठी सहकार्य करावे आणि त्यांना आवश्यक ती माहिती देण्यात यावी. दरम्यान या मोहीमेमुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असुन मुलभुत सुविधांमध्ये सुधारणा करणे शय होणार आहे. तसेच सर्व्हेक्षणाचे काम सुरू झालेनंतर लेखी तक्रार दाखल करावयाची झाल्यास राल.ीर्शींळीळेप२सारळश्र. लेा या ई-मेल वर करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक अहमदनगर महानगरपालिका यांचे वतीने करण्यात आले आहे.